कॅम्प

आनंदपीठ कॅम्प कोळवण

कोळवण येथे आनंदपीठाच्या वतीने यशस्वी कॅम्पचे आयोजन

कोळवण खोऱ्यातील विद्यार्थ्यांकरिता तीन दिवसीय आनंदपीठ कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र, मुख्याध्यापिका ढगे मॅडम आणि लोकमतचे संपादक संजय आवटे सर

कॅम्पमधील विद्यार्थ्यांसोबत संविधान साक्षरतेबाबत संवाद साधताना आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करताना संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र.

आनंदपीठ कॅम्प कोळवण उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना लोकमतचे संपादक संजय आवटे सर.

मुख्याध्यापिका ढगे मॅडम विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना.

आनंदपीठ कॅम्प @भालगुडी डेज

आनंदपीठाचे उद्घाटन २२ मे २०२५ या दिवशी झाले. सोनम वांगचुक यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याचसोबत जे पहिले शिबिर आपण घेतले, त्या शिबिरामध्ये मुला-मुलींशी गप्पाही मारल्या.

पहिल्या शिबिराला सुमारे साठ विद्यार्थी आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी आले. महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यांमधून साठ विद्यार्थी आले. तेरा ते एकोणीस या वयोगटासाठी हा कॅम्प होता. त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती.

या शिबिरामध्ये सोनम वांगचुक, अरुण शर्मा, संभाजी भगत, डॉ. हमीद दाभोलकर, अनिकेत मोताळे, आशुतोष शिर्के, संजय आवटे, सरफराज अहमद, शाहू पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुला मुलींशी संवाद साधला. शिबिरातील मुलांची निवड आपण मुलाखतीतून निश्चित केली होती.

हा होता समर कॅम्प. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सगळे चित्र बदलले. तरीही हा कॅम्प अधिक यशस्वी झाला. कारण आपत्तीमधून ही मुलं बरंच काही शिकली. आजही ही सर्व मुलं संपर्कात आहेत.

संपर्क

+९१ ९०२१२७४४७७

कुठे

सह्याद्रीच्या कुशीतल्या कोळवण खोऱ्यात. भालगुडी नावाच्या टुमदार गावातल्या डोंगरावर. पुण्याच्या ©हिंजवडीपासून आणि लोणावळ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर. पवना डॅमपासून अर्धा तास, तर हाडशी तलावापासून हाकेच्या अंतरावर.

कोणासाठी

१३ ते १९ या वयोगटातील
सर्व मुला-मुलींसाठी.