कॅम्प

आनंदपीठ कॅम्प @भालगुडी डेज

आनंदपीठाचे उद्घाटन २२ मे २०२५ या दिवशी झाले. सोनम वांगचुक यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याचसोबत जे पहिले शिबिर आपण घेतले, त्या शिबिरामध्ये मुला-मुलींशी गप्पाही मारल्या.

पहिल्या शिबिराला सुमारे साठ विद्यार्थी आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी आले. महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यांमधून साठ विद्यार्थी आले. तेरा ते एकोणीस या वयोगटासाठी हा कॅम्प होता. त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती.

या शिबिरामध्ये सोनम वांगचुक, अरुण शर्मा, संभाजी भगत, डॉ. हमीद दाभोलकर, अनिकेत मोताळे, आशुतोष शिर्के, संजय आवटे, सरफराज अहमद, शाहू पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुला मुलींशी संवाद साधला. शिबिरातील मुलांची निवड आपण मुलाखतीतून निश्चित केली होती.

हा होता समर कॅम्प. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सगळे चित्र बदलले. तरीही हा कॅम्प अधिक यशस्वी झाला. कारण आपत्तीमधून ही मुलं बरंच काही शिकली. आजही ही सर्व मुलं संपर्कात आहेत.

संपर्क

+९१ ९०२१२७४४७७

कुठे

सह्याद्रीच्या कुशीतल्या कोळवण खोऱ्यात. भालगुडी नावाच्या टुमदार गावातल्या डोंगरावर. पुण्याच्या ©हिंजवडीपासून आणि लोणावळ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर. पवना डॅमपासून अर्धा तास, तर हाडशी तलावापासून हाकेच्या अंतरावर.

कोणासाठी

१३ ते १९ या वयोगटातील
सर्व मुला-मुलींसाठी.